info@tumhiaamhipalak.org

+91-777 000 6860 | 777 000 6760

Tumhi Aamhi Logo

तुम्ही-आम्ही पालक

सुजाण व जागरूक पालकत्वाला वाहिलेले दर्जेदार मासिक

'तुम्ही-आम्ही पालक' मासिकाच्या दहाव्या वर्षपूर्ती आणि
१०० व्या अंकाच्या निमित्ताने महत्वाचे निवेदन

नमस्कार,
आपण माझे चांगले मित्र आणि परिचित आहात. आपणास कल्पना आहेच की अतिशय उदात्त अश्या सामाजिक हेतूने ‘तुम्ही-आम्ही पालक’ मासिकाची दहा वर्षांची वाटचाल झालेली आहे. हे मासिक महिनोगणिक व वर्षानुवर्षे खुलत गेलं आणि उत्तम होत गेलं. या मासिकातील मजकूर अनेकांना हवाहवासा वाटू लागला. तरीदेखील आमच्या असं लक्षात येत आहे की, तुम्ही आमचे चांगले मित्र आणि परिचित असूनही हे मासिक अजूनतरी तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आणि पोहोचले असेल तर तुम्ही त्याचे नियमित वर्गणीदार नाहीत.

दहा वर्षाच्या वाटचालीत या मासिकाला आम्ही आमच्या पाल्याप्रमाणे जपलं आणि समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून शक्य तेवढ्या उत्तम दर्जाचा मजकूर देत प्रबोधनाचं काम केलं आहे. यापुढे देखील ते करण्याचा आमचा माणस आहे. मात्र आता त्यासाठी आपणा सर्वांच्या सहभागाची, सहकार्याची नितांत गरज आहे. आपल्याला मुद्दामहून स्पष्ट करतोआहे की हे मासिक म्हणजे काही आमचा व्यवसाय नाही आणि त्याच्यावर आमचा चरितार्थ नाही. ते सक्षमपणे आणि सुरळीतपणे चालावं एवढीच माफक अपेक्षा मात्र नक्कीच आहे. जे मला जवळून जाणतात त्यांना कल्पना आहे की आजवर मला जमेल तसे अनेकांना मी सहकार्य करतच आलेलो आहे. आता आपल्याकडून हा साहित्याचा ठेवा जतन करण्यासाठी तेच अपेक्षित आहे.

मोबाईलच्या वाढत्या प्रभावामुळे आजच्या काळात वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत चाललेला आहे. त्यामुळे या कालावधीत काही मोठमोठी मासिकं बंद पडलेली आहेत. मात्र आम्ही या मासिकाला जपण्याचा आटोकाट प्रयत्न नक्कीच करत आहोत. त्यासाठीच हे निवेदन आपणास पाठवत आहोत.

या मासिकाची वार्षिक वर्गणी केवळ ₹ 700 आहे ( साध्या पोस्टाने, कुरिअरने हवी असल्यास 500 रुपये जादा ) आणि जर तुम्हाला डिजिटल कॉपी हवी असल्यास ती केवळ ₹ 300 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. एकूणच वर्षातील दहा अंकाच्या किंमतीमध्ये बारा अंक उपलब्ध होतील.

आम्हाला कल्पना आहे की साधारणपणे पाच टक्के मासिकं पोस्टाच्या दिरंगाईने वेळेत पोहोचत नाहीत. ज्यांना ती मिळत नाही त्यांच्यासाठी आम्ही ती मासिकं पुण्यातील आमच्या कार्यालयातून एकत्रितपणे देण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि आपणास कल्पनाही आहे की आम्ही आजवर शेकडो मासिकं कोणताही मोबदला न घेता वितरित केलेली आहेत. अन्यथा कुरिअरचा पर्याय आहेच.

मात्र यापुढे या मासिकाची योग्य रीतीने वाटचाल व्हावी यासाठी आपणास आवाहन करण्यात येत आहे की, किमान आपल्या मैत्रीखातर आपण स्वतः आणि आपल्या परिचितांच्या पैकी किमान दोन-तीन जणांना या मासिकाचे वर्गणीदार होण्यास प्रवृत्त करावे. तसेही आपणास कल्पना आहे, की एक वेळ कुठेही बाहेर जेवायला गेल्यानंतर यापेक्षा जास्त रक्कम एका बैठकीत आपण खर्च करता, मॉलमध्ये शॉपिंगला गेल्यानंतर कळत- नकळत कितीतरी जास्त पैसे विनाकारण खर्च होत असतात. त्याचीच बचत करून ही साहित्य मेजवानी दीर्घकाळ मिळण्यासाठी या नेक कामात आपले सहकार्य लाभेल असे बघा.

आपण एक संवेदनशील व्यक्ती आहात असे मी समजतो. त्यामुळे माझ्या या विनंतीचा मान राखाल अशी आशा करतो. आपल्या सकारात्मक कृतीमुळे साहित्य क्षेत्रातील हा ठेवा जतन होण्यास मोलाची मदतच होईल. मासिक दर महिन्याच्या २५ तारखेला पोस्ट होते. ताज्या अंकासाठी आपण आपले मासिक २३ तारखेपर्यंत बुक करू शकता.

१०० व्या अंकाचा प्रकाशन सोहळा ५ ऑगस्ट २०२३ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजी नगर, पुणे ४११००५ येथे सकाळी ११. ३० वाजता संपन्न होईल. आपण त्यात जरूर सहभागी व्हावे.

धन्यवाद !

आपलाच

हरीश बुटले
संस्थापक – संपादक
9422001560

Dec 2023 Edition